मेष:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आवडते खाद्यपदार्थ खाल. सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल. पैशाची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी. गोड बोलण्याने इतरांवर छाप पाडाल.
वृषभ:- तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस मनाजोगा घालवाल.
मिथुन:- क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. उत्तम शय्यासौख्य लाभेल. हातातील कामाला यश मिळेल.
कर्क:- व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. पिछेहाटीला घाबरून जाऊ नका. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
सिंह:- औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. व्यावसायिक स्तरावर खुश राहाल.
कन्या:-विशाल दृष्टीकोन बाळगावा. तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. लेखनाचे कौतुक केले जाईल.
तूळ:-कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील. वारसाहक्काच्या कामांना गती येईल. सासुरवाडीची मदत घेता येईल. रेस, सट्टा यांसारख्या गोष्टीतून धनलाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील.
वृश्चिक:-एकमेकांचे विचार जाणून घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. क्षुल्लक गोष्टी क्रोधाला कारणीभूत ठरू शकतात.
धनू:-सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेऊ नका. काही गोष्टींना मुरड घालावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. दिवस सुस्तपणात घालवाल.
मकर:-आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल. प्रेमभावना वाढीस लागेल. नवीन ओळखी वाढतील. त्यातूनच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ:-कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल.
मीन:-साहित्याची आवड जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल. डोकेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल.