जळगाव, प्रतिनिधी । शहरातील इच्छादेवी चौक येथे अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा व शहर च्या वतीने आज शिवरत्न नरवीर शिवाजी काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा व शहर जळगाव इच्छादेवी चौक येथे आज दिनांक 13 रोजी शिवरत्न नरवीर शिवाजी काशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अ.भा.जिवा सेना व समाज बाधव उपस्थित होते. यावेळी प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी काशीद यांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला व मनोगत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी अ. भा. जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाघ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष कूवर, अ.भा. जिवा सेना तालुका अध्यक्ष राहुल जगताप, जिवा सेना शहर अध्यक्ष उदय पवार, जिवा सेना शहर कार्याध्यक्ष विशाल कुवर, जिवा सेना शहर संपर्क प्रमुख राजू जगताप, शहर संघटक किरण सोनवणे, कल्पेश फुलपगारे आदी समाज बाधव उपस्थित होते.