जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज शिवसेना जळगाव महानगरात तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य कार्ड व बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले.
शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात शिवसेना जळगाव महानगर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योग स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील वयोगट 6 ते 16 मधील 1171 विद्यार्थ्यांनी एक मिनीटाची योगासन करतानाची चित्रफित व्हॉटसऍ़प दवारे पाठवून सहभाग नोंदविला होता. 1171 पैकी योग शिक्षिका ज्योति पटेल व अनिता पाटील यांनी 50 विद्यार्थ्यांची निवड केली. यासह 315 कुटुंबीयांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड शिवसेने तर्फे वाटप करण्यात आले. यावेळी योगस्पर्धेचे बक्षीस सुद्धा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसैनिक-नगरसेवक विराज कावडीया, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, आनंद पब्लिकेशनचे आनंद कोठारी, शहर संघटक दिनेश जगताप, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी, ज्योती शिवदे, युवासेनेचे स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, पियुष गांधी, जब्बार पटेल इ. मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना नोटबुक, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, सन्मानपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले. यासह 315 आरोग्य योजनेचे कार्ड वाटप झाले. सूत्र संचालन उमाकांत जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, संदिप सुर्यवंशी, पियुष तिवारी, राहूल चव्हाण, पियुष हसवाल, गोकुल बारी, सौरभ कुळकर्णी, सचिन शिवदे, प्रशांत वाणी, राहूल ठाकूर, रघुनाथ राठोड, समीर कावडीया, सागर जगताप, विपिन कावडीया, मयुर जाधव, मयुरी पाटील, दिव्या सोनार, सुनिल मराठे आदींनी परिश्रम घेतले.