चोपडा, प्रतिनिधी । शहर व तालुका काँग्रेसतर्फे आज १३ रोजी इंधन दरवाढीविरोधात जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस यांच्या किमती भरमसाठ वाधवल्याने प्रचंड महागाई भडकलेली आहे. जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाची दरवाढ कमी करण्यासाठी मोदी सरकार विरुद्ध हे आंदोलन करण्यात आले. जनशिक्षण चोपडा येथे सकाळी दहा वाजता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांनी रॅलीला संबोधित केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी होत असताना केंद्र सरकार मात्र सातत्याने इंधनाची दरवाढ करीत आहे. ही एक प्रकारे जनतेची लूट आहे .ही दर वाढ त्वरित थांबवण्यात यावी आणि इंधनाचे दर कमी करावेत. तसे न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष के.डी. चौधरीसर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, चोपडा तालुका समन्वयक श्री नंदकिशोर सांगोरे सर , चोपडा सूतगिरणीचे संचालक श्री राजेंद्र पाटील , श्री भागवत राव पाटील, रमाकांत सोनवणे, प्रदीप पाटील ,अशोक साळुंखे ,शशिकांत साळुंखे, किरण सोनवणे ,चेतन बाविस्कर, मधुकर पाटील, रमेश देशमुख, जे .झेड. , देवकांत चौधरी, गोपीचंद चौधरी, इलियास पटेल, वजाहत काज़ी, देविदास साळुंखे ,देवानंद शिंदे,प्रा. शैलेश वाघ, प्रा. संदीप पाटील,ऍड.एस.डी.पाटील,महेंद्र सोनवणे,आरिफ शेख,सुनील बागुले,नंदलाल शिंदे, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, एन.एस.यु.आय.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी एन.एस.यु.आय.च्या कार्यकर्त्यांनी चारचाकी गाडीवर गॅस हंडी ठेऊन चारचाकी वाहन दोराने बांधुन ताणून मोदी सरकारचा निषेध केला.सदरची रॅली चोपडा शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. लोहने पेट्रोलपंपांवर थांबविन्यात आली.ठिकठिकाणी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढ कमी झालीच पाहीजे. महागाई कमी झालीच पाहीजे.म्हणून घोषणाबाजी झाली. सोनियाजी गांधी ,राहुलजी गांधीं, नानासाहेब पटोले,संदीप भैया पाटील ज़िन्दाबादच्या घोषणा देण्यात आल्यात.जय जवान जय किसान या घोशनेसह ,काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणानी परिसर दुमदुम झाला आहे