जळगाव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे तारुण्य, उत्साह, शौर्य, आंदोलन, संवाद, प्रवास, पूर्व व पूर्ण नियोजन यांची सांगड घालत युवकांमध्ये राष्ट्र भक्तीचा भाव जागृत करणारी एक दंडशक्ती म्हणुन शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील कार्यरत आहे. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता नेहमी तत्पर असते. तसेच कोरोनाच्या काळात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिके सोबत थर्मल स्क्रीनिंग, अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, धान्य वाटप व हेल्पलाइनच्या माध्यमातून कोविड हॉस्पिटल्स मधील बेड्सची उपलब्धता, रक्तदान व विविध प्रकारच्या सेवाकार्यात अभाविपचे युवा कार्यकर्ते सक्रिय होते. ज्ञान, शील व एकता या त्रिसुत्रीवर विद्यार्थी परिषदेने ७३ वर्षाचा संघर्ष ९ जुलै रोजी पूर्ण केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यात गेल्या १० दिवसांपासून सूरु असलेल्या सेवा वस्त्यांमध्ये “परिषद की पाठशाला” उपक्रमात विद्यार्थ्यांना अभाविप महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.मनीष जोशी सरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य 107 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले, तसेच अभाविप शिष्टमंडळाने जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री.प्रवीण मुंडे व विविध शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भेट घेतली व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
अभाविप जळगाव जिल्हा प्रमुख प्रा.सुनील कुलकर्णी, महानगर अध्यक्ष प्रा.भुषण राजपूत यांच्या हस्ते वाल्मिक मैदानावर वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. 73 व्या वर्धापन दिनानिमित्त 73 वृक्ष संवर्धनाचा अभाविप जळगाव चा संकल्प यावेळी अभाविप जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, पवन भाई, चिराग तायडे, आकाश पाटील, पौर्णिमा देशमुख, भाग्यश्री कोळी, रोशनी जैन, माधुरी पाटील व अादी कार्यकर्ते उपस्थित होते.