जळगाव – जळगाव येथील रहिवासी तथा जि.प.शिक्षक संदिप पाटील यांचा अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे राज्यस्तरीय कोविडयोद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१ मानपत्र,पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा व इतर मान्यवरांच्या उपस्थित देऊन गौरव करण्यात आला.नुकताच झुम मिटिंग ऍप द्वारे ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात हे मानपत्र प्रदान करण्यात आले.
कोविड काळात केलेल्या शैक्षणिक व इतर कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.कोविड-१९ महामारीमूळे संपूर्ण महाराष्ट्रात शाळा बंद असल्याने या काळात शाळा आपल्या दारी,गृहभेटीतून शिक्षण या सारखे उपक्रम संदिप पाटील यांनी राबविले व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड न पडू देत शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवली.शासनाच्या आदेशानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत घरोघरी जात कोविड बाबत विविध सर्वेक्षण केले व महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती केली.विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप केले.या कार्यासाठी हे राज्यस्तरीय महासन्मान मानपत्र देण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे कळविण्यात आले.