चाळीसगाव – चाळीसगाव येथील लोकनायक तात्यासाहेब स्व.महेद्रसिंह राजपूत यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंह राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ व जलमित्र परिवार चाळीसगांव यांच्यातर्फे शिवकॉलनी, बंजाराकॉलनी तसेच स्वयंदिप परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय विद्यालयात ही पुण्यतीथीनिमित्ताने तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुचित्राताई पाटील यांनी तर सुत्रसंचालन शिघ्रकवी रमेश पोतदार व सविताताई राजपूत यांनी केले.
यानिमित्ताने प्रा. आर. एम. पाटील यांनी तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवकॉलनी येथे नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, नगरसेवक संजय राजपूत, महेंद्र पाटील, भगवानआबा पाटील, घृष्णेश्वर पाटील, दिपक पाटील, प्रदीप राजपूत, विजयाताई पवार, सामाजिक कार्यकर्ते विश्वास चव्हाण, आर.सी.पाटील, मुन्ना राजपूत, टोनू राजपूत, पप्पू राजपूत, धर्मा बच्छे, कुणाल पाटील, सौरभ त्रिभुवन, बडगुजर मावशी, कविता पाटील, जयश्री अहिरे, स्वाती राजपूत रेल्वे स्थानकाचे मॅनेजर श्री. बडगुजर सर, मुख्य स्वास्थ निरीक्षक विलास पाटील, सोमनाथभाऊ माळी, शशांक अहिरे, कैलासनगर येथे पुंडलीक शिरुडे काका, सौ. लताबाई पाटील, राजेंद्रकुमार गुप्ता, सौ. संध्या गुप्ता, पंकज पाटील, मनोज बऱ्हाटे, दादा राजपूत, कु. चार्वी पाटील, कपिल गुप्ता स्वयंदीप प्रकल्प येथे मीनाक्षीताई निकम, भारती चौधरी, पंढरीनाथ राजपूत, माई, शालू, मनिषा, गुप्ता भाभी, पृथ्वीराज राजपूत, स्वाती राजपूत व स्वयंदिपच्या सर्व भगीनी उपस्थित होत्या.