जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांच्या निलंबन मागे घेऊन आज त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. तसेच याबाबत माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व देशमुख यांचे स्वागत केले व त्यांना नियुक्ती पत्र, शाल, श्रीफळ देवून पक्ष प्रवेश देण्यात आला. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी विनोद देशमुख यांची ताकद संघटनेला मिळणार असून संघटना कशा प्रकारे प्रभावीपणे काम करेल याचे प्रयत्न विनोद देशमूख व त्यांचे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. मनीष जैन, शहराध्यक्ष मंगला पाटील, संजय पवार, सुनील माळी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.