जळगाव – येथील इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्याच्या वतीने आज डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
इंजिनीअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्याच्यावतीने आज डॉक्टर्स दिनानिमित्त कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णसेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स चा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील डॉ. प्रसादकुमार रेड्डास्वामी, डॉ.जयप्रकाश रामानंद, डॉ. विवेक चौधरी, डॉ. पवन गोंधलेकर, डॉ. राहुल महाजन, डॉ. संदीप जोशी, डॉ. सागर पाटील, डॉ. सुनील शिंगाणे आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष मोनालिका किशोर पाटील, खान्देश विभागीय उपाध्यक्ष अक्षय पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र माळी, जळगाव तालुका संपर्कप्रमुख आदित्य थोरात, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजपरी खैरे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मोहिनी महाले, जळगाव जिल्हा सचिव प्रसाद पाटील आदींची उपस्थित होती.