Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजपासून मोठे बदल!, तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता

by Divya Jalgaon Team
November 1, 2020
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी! 21 हजार पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून जबरदस्त फायदा

नवी दिल्ली: आज 1 नोव्हेंबरपासून नव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आजपासून आपल्या दैनंदिनीत काही महत्वाचे बदल होत आहेत. ज्याचा परिणाम आपल्या महिन्याच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते गृह कर्जावरील व्याजदरात बदल होणार आहे. त्याचबरोबर आज केरळमध्ये भाजीपाल्यालाही किमान आधारभूत किंमत अर्थात MSP लागू होणार आहे. (Big economical changes in our life from today)

गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल नाही

सरकार तेल कंपन्या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅसची किंमत ठरवत असतात. पण सणवारांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींना दिलासा दिला आहे. आज घरगुती गॅस अर्थाल एलपीजी गॅसची किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पण उद्योग-व्यवसायांसाठी लागणाऱ्या गॅसची किमतीत मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसायांसाठी लागणाऱ्या 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता 1 हजार 241 रुपये 50 पैसे झाली आहे.

गॅस सिलेंडरच्या होम डिलिव्हरी नियमात बदल

आजपासून LPG गॅस सिलिंडर होम डिलिव्हरीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आजपासून DAC अर्थात डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ ग्राहकांच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल. गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीदरम्यान हा OTP सांगावा लागणार आहे. त्यानंतर गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार आहे.

SBI च्या बचत खात्यांवर व्याज कमी मिळणार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBIच्या बचत खात्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. SBI बँकेने १ लाख रुपयांच्या ठेवीवरील व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.

केरळमध्ये भाजीपाल्याला किमान आधारभूत किंमत!

केरळ सरकार शेती क्षेत्रात एक मोठं पाऊल उचलत आहे. आज केरळमध्ये भाजीपाल्याला किमान आधारभूत किंमत अर्थात MSP लागू होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजीपाल्याला लागवडीच्या खर्चाच्या कमीत कमी 20 टक्के अधिक MSP मिळणार आहे.

Bank of Barodaचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त

देशातील तिसरी मोठी सरकारी बँक असलेल्या Bank of Barodaने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटच्या तुलनेत Bank of Barodaने व्याज दर 7 टक्क्यांवरुन 6.85 टक्के केले आहे. त्यामुळे गृह, वाहन, मॉर्टगेज, शिक्षण आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे.

Share post
Tags: Bank Of BadodaGas CilendarHome DeliveryIndian CurrencyInterestlatest newsMarathi NewsNew DelhiNew RulesSBIआजपासून मोठे बदल!तुमच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता
Previous Post

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर

Next Post

रविना टंडनच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट; एफआयआर दाखल

Next Post
रविना टंडनच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट; एफआयआर दाखल

रविना टंडनच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट; एफआयआर दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group