बीजिंग : बजेट आणि मिड सेगमेंटमध्ये (किफायतशीर आणि मध्यम किंमतीतले फोन) लीड केल्यानंतर शाओमी (Xiaomi) लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) लाँच करु शकते. लवकरच जगभरात फोल्डेबल फोन येणार आहेत. त्यामध्ये शाओमी कंपनीदेखील मागे राहणार नाही. (Xiaomi’s foldable smartphone with 108 megapixel camera on the way to launch, find out features)
शाओमीने यापूर्वी MI Mix Alpha या स्मार्टफोनचा खुलासा केला होता. हा फोन फ्लेक्सिबल OLED डिस्लेप्रमाणे होता. परंतु कंपनीने हा फोन लाँच केला नाही. आता कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
XDA च्या रिपोर्टनुसार शाओमी कंपनी सध्या फोल्डेबल डिव्हाईसवर काम करत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या डिव्हाईसचं नाव ‘Cetus’ असू शकतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नवीन फोल्डेबल स्मार्टफोन MIUI च्या अँड्रायड 11 वर काम करेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या फोनचा कॅमेरा, या फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगॅन 800 सिरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो हाय एंड स्पेक्समध्ये गणला जातो. या फोन खूप महाग असणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच फोल्डेबल फोनबाबत माहिती दिलेली नाही. यापूर्वीदेखील कंपनीने फोल्डेबल फोनचं डिझाईन लिक केलं होतं.