मेष:- आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.
वृषभ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.
मिथुन:- मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अतिघाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.
कर्क:- ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.
सिंह:- अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.
कन्या:- कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.
तूळ:- जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.
वृश्चिक:- मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू:- अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.
मकर:- केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल.
कुंभ:- कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.
मीन:- दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल.