जळगाव – दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण झाले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2018 मधील पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातील प्रियंका सुर्यवंशी व राहूल बेलदार या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
दोन्ही विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहे. प्रियंका हिचे वडील मुख्याध्यापक आहे तर भाऊ पोलिस दलात कार्यरत आहे. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात मिळणारे योग्य मार्गदर्शन व सहकार्य यांचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. तज्ज्ञ प्राध्यापक व उच्च अधिकारींद्वारा मिळणारे मुलाखतीचे मार्गदर्शन याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असल्याचे सांगितले. या प्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील यांनी प्रियंका सुर्यवंशीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी प्रा.हेमंत साळुंखे, प्रा.कपिलदेव कोळी,प्रा.उमेश सुर्यवंशी,प्रा.ललित विसपुते व श्री.राजेंद्र वाघमारे उपस्थित होते. तसेच दिशा परिवारातील डाॅ.प्रा.अविंत पाटील, प्रा. सुरेश पांडे, प्रा.एन.डी पाटील, श्री.आर.के.पाटील सर व श्री.प्रविण पाटील सर यांनी अभिनंदन कळवले आहे.