जळगाव – लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी असले तरी डॉ भूषण मगर हे संभाव्य उमेदवार असून लोकसभा मतदारसंघात भेटी-गाठीच्या माध्यमातून शेतकरी,तरुण, उद्योजक,विद्यार्थी,सामाजिक संस्था-संघटना ,विविध घटकातील जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
डॉ भूषण मगर हे मूळचे उपखेड ता.चाळीसगाव इथले असून त्यांचे प्राथमिक,व उच्च प्राथमिक शिक्षण पाचोरा येथे झाले असून वैद्यकीय ज्ञानाचा फायदा आपल्या पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देत असून पाचोरा येथे स्थायिक आहेत.
डॉ भूषण मगर हे आरोग्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने आरोग्यदूत समजले जातात करण की;कोरोनाच्या काळात पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागातील स्वतःचे विघ्नहर्ता हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोफत आरोग्यसेवा दिली. हे हॉस्पिटल महाराष्ट्रातले पाहिले खाजगी कोविड सेंटर होते त्या सोबतच दोन हजार रुग्णाची मोफत OPD करणारे ते खान्देशाततील पाहिले खरेखुरे आरोग्य समाजसेवक होते.आजवर डॉ.भूषण मगर यांनी क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हणून लोकसभा मतदार संघातील एकूण लोकांची मागणी की डॉ भूषण मगर हे खासदार व्हावे .कारण ते आपल्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकतात.
सध्या संपूर्ण लोकसभा मतदार संघात डॉ भूषण मगर भेटी घेत असून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेत असून शक्य तेवढी मदत करीत आहे .संपूर्ण जळगाव जिल्हाभर आरोग्यसेवेचा लौकिक,असून साधी राहणी-उच्च विचार,प्रत्येकाशी आपुलकीने वागणे,कोणत्याही क्षणी मदत करण्यासाठी तत्पर असणारा हेल्पफुल पर्सन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा