जामनेर प्रतिनिधी – शहरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वल्लभ नगर भागातील रहिवाशी कुलभूषण चतुर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कुलभूषण चतुर यांनी स्व. रवींद्र क्रीडा संकुलच्या मागे कांग नदीकाठी असलेल्या विहिरीत गळ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. कुलभूषण चतुर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा परीवार आहे.