जळगाव – जागतिक डॉक्टर डे निमीत्त जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोतर्फे आज गोदावरी फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.
आज डॉक्टर डे
गेल्या वर्षभरात कोविड रूग्णांना जिवनदान देऊन भरीव कार्य करणार्या गोदावरी फाऊंडेशनचा जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष पी आर कुळकर्णी, कार्याध्यक्ष मिलींद चौधरी, सचिव जगदिश चांगरे, सहसचिव प्रकाश बाविस्कर, सहसदस्य सुधिर केर्हाळकर, उपसचिव दिपाली भाटीया, सदस्य सिताराम बर्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. गोदावरीच्या वतीने माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी सन्मान स्विकारला यावेळी असोतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनला नेहेमीच माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि गोदावरी फाउंडेशनचे सहकार्य मिळत आले आहे. गेल्या वर्षभरात गोदावरीच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाने सिहांचा वाटा उचलला असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड लेखापाल योगेश पाटील इ उपस्थीत होते.