Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्याचे कृषि विभागाचे आवाहन

by Divya Jalgaon Team
July 1, 2021
in कृषी विषयी, जळगाव
0
प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

जळगाव – केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह|यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै, 2021 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम-2021 मध्ये राबवण्यिात येत आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.

खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,

बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,

भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये,

तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,

मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

तुर- विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,

कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये,

मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी व इतर पिकांसाठी 2 टक्के व कापूस पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण
आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव, पाचोरा, अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, जळगाव, भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई. टोल फ्री क्रमांक 1800 103 7712, आपले सरकार सेवा केंद्र, सर्व (सी. एस. सी केंद्र) जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: #krushi newsDeadline for participation in Pradhan Mantri Pikvima Yojana till 15th JulyDivya Jalgaonजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीप्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत
Previous Post

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

Next Post

जामनेर येथे ५२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
उस्मानिया पार्क येथे ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जामनेर येथे ५२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group