मेष:- मानसिक अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. सामुदायिक बाबींचे भान राखावे. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका.
वृषभ:- व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे लागेल. जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी.
मिथुन:- कामाची धांदल उडेल. योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका. मानसिक चंचलतेला आवर घालावी.
कर्क:- वैचारिक शांतता जपावी. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. मौजमजा करण्याकडे अधिक कल राहील. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका.
सिंह:- प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातविकाराचा त्रास संभवतो. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. अतिकाळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
कन्या:- भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत.
तूळ:- बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पित्त विकाराचा त्रास संभवतो. नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा. सहकार्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.
वृश्चिक:- तुमची चिडचिड वाढू शकते. आज वेळ चुकवून चालणार नाही. न आवडणार्या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल. वाहन
चालवताना सावधानता बाळगावी.
धनू:- कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. समोरील प्रश्न शांततेने सोडवावे लागतील. घरातील वातावरण तप्त राहील. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत.
मकर:- मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फार घाई उपयोगाची नाही. आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा.
कुंभ:- वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बोलण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तामसी पदार्थ खाल.
मीन:- चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका. भडक विचार नोंदवू नका. छंद जोपासण्यात वेळ घालवावा. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल.