जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीररित्या तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आज दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे, याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील मनुर गावात संशयित आरोपी सागर रामचंद्र बावस्कर (वय 28) हा संशयित आरोपी बेकायदेशीररीत्या तलवार बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या गोपनीय माहितीनुसार पथक मनुर येथे रवाना केले संशयित आरोपी सागर बावसकर याला बोदवड ते मनोर रस्त्यावर असलेल्या भैरवनाथ बाबा मंदिराजवळून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील एक तलवार हस्तगत केली असून बोदवड पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोहेकॉ रविंद्र गायकवाड, राजेंद्र पवार, उमेशगीरी गोसावी यांनी केली आहे.