जळगाव प्रतिनिधी । आज सकाळच्या सुमारास ६८ वर्षीय वयोवृध्दाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यू ची नोंद रामानंद नगर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
जळगाव शहरामधील पिंप्राळा शिवारातील गट क्र.३२० मधील शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी सेवानिवृत्त पोलीस हवालदार लालसिंग उदयसिंग पाटील यांना रमेश भिकू यादव (वय ६८, रा.मिराबाई नगर, पिंप्राळा) यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती मिळाताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनमोल पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलगा संजय यादव याने कालपासून वडीलांचा शोध घेतला. बुधवारी तो त्यांना शोधण्यासाठी पाळधीपर्यंत पोहचला आणि त्याला वडिलांचा मृतदेह पिंप्राळा शिवारातील विहिरीत आढळून आल्याचा निरोप मिळाला. आजारपणाचामुळेच वडील रमेश यादव यांनी आत्महत्या केल्याचे मुलगा संजय यादव याने बोलतांना सांगितले. दरम्यान मयत रमेश यादव त्यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई, अविवाहित मुलगा संजय व विवाहित मुलगी अरुणा संजय पाटील असा परिवार आहे. रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.