Thursday, March 12, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी जितेंद्र कंडारेला १० दिवसांची पोलीस कोठडी

by Divya Jalgaon Team
June 30, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी जितेंद्र कंडारेला १० दिवसांची पोलीस कोठडी

पुणे, वृत्तसंस्था । भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र  कंडारे याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर येथे अटक करण्यात आले. त्याला आज पुणे विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात  आले  इंदूर येथे एका वसतिगृहाच्या इमारतीत कंडारे वेषांतर करून राहत होता. जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दराने हितचिंतकांना विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल १,२०० कोटींचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्यात मध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सुनील झंवर अजूनही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला

कारवाईची आधीच माहिती मिळाल्याने जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर हे प्रमुख संशयित आरोपी फरार झाले होते.  तपासादरम्यान कंडारेची सासुरवाडी इंदूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कंडारेनं दाढी आणि मिशा वाढवल्या आहेत. त्यामुळे त्याचे रुप पूर्णपणे बदलले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हे रूपांतर करून घेतले होते

मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा २०१५ मध्ये समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकाने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता या मालमत्ता काही ठराविक लोकांना मातीमोल भावात विकल्या गेल्या. या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या.

Share post
Previous Post

लग्नाच्या बेडीत अडकवून तरुणाची दीड लाखात फसवणूक

Next Post

नोंदणीकृत घरेलू कामगारांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर करण्याचे आवाहन

Next Post
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

नोंदणीकृत घरेलू कामगारांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group