जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात ४४ वर्षीय व्यक्तीला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितावर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे शंकर नारायण कोकाटे (वय-४४) हे प्लंबरचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गल्लीत राहणारा संशयित आरोपी राजेश जगन सोनवणे हा तरूण घराकडे येवून शंकर कोकाटे पाहतो व निघून जातो. पुन्हा आल्यानंतर शंकर कोकोट यांनी घराकडे का येतो अशी विचारणा केली असता संशयित आरोपी राजेश सोनवणे याने शिवीगाळ केली व बाजूला पडलेली विटाने बेदम मारहाण केली. यात कोकाटे जखमी झाले.
शंकर कोकाटे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात संशयित आरोपी राजेश सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना ललित भदाणे करीत आहे.


