जळगाव प्रतिनिधी । शहरातील राहणाऱ्या एका भागातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील टागोर नगरात परिसरात राहणारी २९ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. काल मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास टागोर नगरात बजरंग पांडूरंग सपकाळे (वय-२९) रा. श्रीराम नगर, जैनाबाद हा तरूणीचा पाठलाग करून तरूणीशी अश्लिल वर्तन करून शिवीगाळ केली. तर चाकूचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकूने स्वत: अंगावर वार करून जखमी करून घेतले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ वागळे करीत आहे.