चाळीसगाव – चाळीसगाव येथील पाटणादेवी रोडलगत असलेल्या वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. समाजातर्फे वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणासोबत मैत्री करून आगळ्या वेगळ्या पद्धतीत वाढ दिवस साजरा करण्यात आला.
चि.रुद्र नागेश आवटे याचा १६ वा वाढ दिवस वीरशैव लिंगायत समाज स्मशान भूमी पाटणा देवी रोड , चाळीसगाव येथे १६ रुक्ष लावून साजरा केला. वाढदिवस केक कापुन साजरा करण्यापेक्षा झाड लाऊन करायचा हा एक नवीन समाजापुढे आदर्श निर्माण करून दिला. त्या बद्दल त्याचे खूप कौतुक देखील होत आहे ह्या मंगल प्रसंगी चाळीसगाव वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेश नगरकर व उपाध्यक्ष नितीन वालेकर ,पर्यावरण प्रेमी कुणाल रुईकर ,लोकनेते स्व.महेद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा ताई पाटील, जलमित्र परिवार चाळीसगाव चे शशांक अहिरे, सविता राजपूत, सोमनाथ माळी तसेच लिंगायत समजाचे समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.