जळगाव – राज्यात कोरोना रुग्णांची सतत असलेली रुग्ण संख्या व त्यातच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारनं सर्वच जिल्ह्यांना तिसर्या टप्प्यात समाविष्ट केले आहे. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील शुक्रवार, 25 रोजी जिल्ह्यासाठी निर्बंध जारी केले असून त्याची 27 जूनपासून अंमलबजावणी होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात तिसर्या लेव्हलसाठी असणारे नवीन नियम लागू करण्यात आले आहे.
- अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले. राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील.
- लोकल आणि रेल्वे बंद राहतील.
- मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
- 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
- स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
- लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
- बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
- शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
- ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल.
- जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.