जळगाव – गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव येथे शिक्षा मंत्रालय सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच अखिल भारतीय टेक्निकल कौन्सिल (ए आय सी टी), द्वारे खेळणे उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी टोयकेथोन 2021 चे आयोजन 22 ते 24 जून 2021 मध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमात एकूण 85 नोडल सेंटर्सवर ग्रंड फिनाले घेण्यात आला त्यात जवळपास पंधराशे हून अधिक टीमने आपले खेळण्याचे आयडियाज प्रस्तुत केल्या त्यानंतर 1500 टीम्स पैकी निवडक टीम्सना पावर जजिंग राउंड मध्ये निवडण्यात आले. टीम्स पैकी विनर घोषित करण्यात येणार आहे. या निवडक टीम्स पैकी अंतिम फेरी मधील विजयी टीमचा 26 जून 2021 रोजी अंतिम परिणाम घोषित होणार आहे.
या कार्यक्रमात प्रति योगिनी भारतीय संस्कृती व इतिहास, भारतीय संस्कृती व तिचे विविध गुण, शिक्षण मानवीय मूल्य, निसर्ग, दिव्यांग व खेळ, आऊट ऑफ द बॉक्स थिंकींग आणि वैचारिक थिंकिंग अशा विविध प्रकारांवर ईल खेळण्यांचे नवीन पद्धतीने सादरीकरण करून प्रतियोगिता घेण्यात आली.
कार्यक्रमात एकूण 17 टीम्स ने जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे प्रथम दोन फेर्या यांचे आयोजन ग्रॅण्ड फिनाले मध्ये झाले. नंतर या 17 तीन पैकी 3 टीम्स या पावर जाजिंग राऊंड साठी सिलेक्ट करण्यात आल्या. या म्हणूनच विजयी टीमचे सिलेक्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय स्तरावरून विद्यार्थ्यांशी इतर नोडल सेंटर्समधील वि्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले, तसेच आणि भारतातील खेळणार उद्योगाबद्दल माहिती देत असताना भारताला खेळणा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर कसे होता येईल यावर संभाषण केले. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळण्यांमध्ये अजून काय नवीन ते पूर्ण सुधारणा करता येतील आणि ते कसे चांगले बनवता येतील याचे मार्गदर्शन सुद्धा केले. याचे लाइव्ह प्रक्षेपणही कॉलेजमध्ये करण्यात आले.
टॉयकिथोन 2021 च्या समापन वेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर विजय पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जळगाव निवडल्याबद्दल भारत सरकार व ए आय सी टी ला धन्यवाद दिले. तसेच त्यांनी डॉक्टर उल्हास पाटील प्रेसिडेंट गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचेही आभार मानले. या कार्यक्रमाचे एस पी ओ सी प्राध्यापक महेश पाटील आणि डिजिटल एडिशन चे एस पी ओ सी प्राध्यापक राहुल गायकवाड यांनीही सर्व टीमचे आभार मानले यावेळी कॉलेजच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.