जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावाने शालेय शुल्क ५० टक्के कमी करून उर्वरित फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी केली आहे.
कोरोना महामारीमुळे मोठे संकट उभे ठाकले असून अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे, मध्यम वर्गही कठीण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. जगणेच कठीण झाले असतांना शाळेची फी भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव टाकला जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बहुसंख्य पालकांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. याचा विचार करून शालेय शुल्क ५० टक्के कमी करून उर्वरित फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलसत्तार पटेल यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना सुद्धा पत्र पाठवून खलील मुद्दे जलीलदादा पटेल त्यात मांडणार आहे की, मागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्रशासन व संचालकांकडून लावला जात आहे.