जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बुधवार, दि २३ जून रोजी म्युकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या ४ रुग्णांना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते डिस्चार्ज कार्ड देऊन रूग्णालयातून निरोप देण्यात आला. या रुग्णांचे लाखो रुपयांचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत झाले आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहे.
पारोळा व नंदुबार येथील अनुक्रमे ५० व ५८ वर्षीय पुरुषांना या म्युकर मायकोसिस आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. तसेच मोरगांव, ता. रावेर आणि कढोली, ता. एरंडोल येथील अनुक्रमे ४८ व ६२ वर्षीय पुरुषांना म्युकर मायकोसिस आजाराची लागण झाली होती. मात्र, त्यांना औषधोपचार व समुपदेशनाद्वारे बरे करण्यामध्ये यश मिळाले. हे सर्व रुग्ण साधारण १६ ते २७ दिवसाच्या कालावधीत बरे झाले आहे.
या रुग्णांवरती अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, म्युकर मायकोसिस विरोधी कृती दलाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाक, कान, घसा उपचार विभागाचे प्रमुख डॉ अक्षय सरोदे, डॉ हितेंद्र राऊत, दंतशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ इम्रान पठाण, डॉ श्रुती शंखपाळ, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ प्रसन्न पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ उमेश जाधव, डॉ तुषार चौधरी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ संदीप पटेल, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ किशोर इंगोले यांनी उपचार केले. तसेच सी २ कक्षाचे इन्चार्ज अधिपरिचारिका वैशाली पाटील, प्राजक्ता कांबळी, गिरीश बागुल, पूजा वायल, माधुरी सुरवाडे, प्रियांका मेढे, सुरेखा परदेशी, गायत्री बहिरम, अनुजा कदम, अंकित बनकर यासह कंत्राटी कर्मचारी प्रफ्फुल नेरकर, मयुर महाजन, शंकर सोनवणे, अमोल तायडे, संतोष चौधरी आदींनी रुग्णसेवेसाठी परीक्षम घेतले.