जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ४३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून तर आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तसेच दिवसभरामधून १६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, जामनेर-४, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ४३ रूग्ण आढळून आले आहे.
आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४२ हजार ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ४१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ९१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.