जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील महाजन नगरात विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे आज महापौर जयश्री महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सचिव डॉ. काजल फिरके, डिस्ट्रिक्ट सचिव टॉबी भगवागर, जुमाना शाकीर, अतुल शहा, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन योगेश गांधी, डिस्ट्रिक्ट सहसचिव तुषार फिरके, डॉ. जयंत जहागीरदार, आसिफ मेमन, उदय पोद्दार, मनोज जोशी, स्वाती ढाके, आशुतोष पाटील आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहरुण परिसरातील महाजन नगरमधील उद्यानाचे गेल्या काही दिवसांपासून महापौर जयश्री महाजन व रोटरी क्लब जळगावच्या माध्यमातून विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्यासह तेथे विविध प्रकारची खेळणी, बाक बसविणे, तसेच उद्यान परिसरातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्णत्वास आल्यानंतर मंगळवारी, दि. 22 जून 2021 रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे उद्यान महापौर जयश्री महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील लहान मुलांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.