जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरात आज सकाळच्या सुमारास जि. प. मधील शिक्षण सभापतींच्या दालनातील छत पडले, यात त्यांचे स्वीय सहाय्यक थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली.
शहरातील जिल्हा परिषदेतील जुनी इमारत ही पूर्ण पणे जीर्ण झालेली आहे. या इमारतीत शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग असे विभाग आहेत. अनेक कर्मचारी या इमारतीत जीव धोक्यात घालून काम करीत असतात. यातच जिल्हा परिषदेतील शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या स्वीय सहाय्यक दालनातील छत आज सोमवारी सकाळी ११ वाजता कोसळले. या घटनेत त्यांचे स्वीय सहाय्यक कांतीलाल पाटील हे थोडक्यात बचावले आहे.
स्विय सहाय्यक यांच्या दालनाचे दुरुस्तीचे पत्र बांधकाम विभागाला ऑक्टोबर २०२० महिन्यापासून देण्यात आलेले आहे. मात्र बांधकाम विभाग या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अजून या विभागाची दुरुस्ती न केल्यास असे छत एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कोसळले तर मोठा दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.