जळगाव – जुन्या वादातून शनीपेठेतील गवळी वाडा भागात सोमवारी दुपारी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. कुंदन सुरेश पाटील (32, रा.धनश्याम काळे नगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून तो बांधकामाच्या ठिकाणी सेंटींग काम करून उदरनिर्वाह करतो.
गेल्या आठवड्यापुर्वी शिवाजी नगरात पत्ते खेळण्याच्या कारणावरून कुंदन सोबत काही तरूणांनी वाद घातला होता व त्या भांडणाचा वचपा रविवारी दुपारी एक वाजता काढण्यात आला. कुंदन हे भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडला असता तीन ते चार जणांनी गोपाळपूरा येथे अचानक त्याच्यावर हल्ला करून दगड व तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखमी केले. जखमीवस्थेत तरूणाला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तरुण गंभीर असून बेशुध्द आहे. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.