Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिर

by Divya Jalgaon Team
June 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिर

जळगाव – रोटरी जळगाव रॉयल्स आणि सन योगा ग्रुपतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोन फार्म हाऊसच्या हिरवळीवर योगासन व प्राणायाम शिबिर रविवारी सकाळी झाले. यात शिबिरार्थींनी विविध प्रकारच्या योगासन, प्राणायामचे प्रात्यक्षिक करुन त्यांना निरोगी, सकारात्मक विचार, आनंदी, समाधानी जीवनाचा मंत्र मिळाला.

योगशिक्षक सुनील गुरव यांनी योगासन, प्राणायामाच्या विविध लाभदायी प्रकारांची माहिती दिली. त्यांनी रोजची धावपळ, वाढत्या ताणतणावाच्या युगात सुदृढ आरोग्यासाठी योगासन, प्राणायामाचे महत्त्व विशद केले. विविध आजारांपासून दूर राहणे किंवा व्याधीमुक्त होण्यासाठी गुरव यांनी शिबिरार्थींना खास प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. शिबिरार्थींच्या शंकाचे निरसनही करण्यात आले.

योगाचे सहशिक्षक किरण दहाड आणि नंदलाल जाधवाणी यांनी अनुभव कथन केले. या शिबिरात सुखी, प्रसन्नमय आयुष्य व जीवनात यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली मिळाल्याचे मत स्नेहा ज्ञानचंदाणी यांनी व्यक्त केले. योगा, प्राणायामामुळे जीवन समृद्ध होत असून वैचारिक प्रगल्भता वाढतेय, असे पवन पाहुजा व जयश्री पाटील यांनी सांगितले. योगाचे सहशिक्षक सुभाष तळले, नेहा तळेले, अर्चना गुरव यांनी शिबिरार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. योगशिक्षक, सहशिक्षकांचा सत्कार रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, मानद सचिव सचिन जेठवाणी, जनसंपर्क प्रमुख विजय लाठी, गोविंद वर्मा, जितेंद्र भोजवाणी आदींनी केला.तर दीपक पाटील यांनी आभार मानले.

या शिबिरात शरद जोशी, गिरीश शिंदे, प्रशांत पारसवाणी, पिंकी मंधाण, सुधा काबरा,  प्रीती चोरडिया, ओमप्रकाश सचदेव, गोल मंडोरा, पारसमल जैन, कन्हैयालाल जाधवाणी, रवी नाथाणी, अनिल मुंदडा, रमेश मताणी आदींनी सहभाग घेतला.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon newsMarathi Newsrotary newsरोटरी जळगाव रॉयल्स
Previous Post

शनीपेठेतील तरुणावर जुन्या वादातून हल्ला

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group