जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, शालेय शिक्षण विभाग, जळगाव, जळगाव जिल्हा हौशी योगा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ 21 जून 2021 या दिवशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालयस्तरावर मुख्याध्यापक/प्राचार्य, तालुकास्तरावर तालुका प्रशासन, गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन गूगल मीट व्दारे ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर आयोजित या कार्यक्रमामधे सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर स्पर्श करून 21 जून 2021 रोजी सकाळी 6.45 वाजता सहभागी व्हावे. कार्यक्रम सकाळी 7 ते 8 या वेळेत संपन्न होणार असून केंद्र सरकारने दिलेल्या जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सर्वानी योग पोशाखात योग मॅट किंवा सतरंजीसह घरीच उपस्थित रहावे. आणि जळगाव जिल्ह्य़ातील राष्ट्रीय योग खेळाडूंसोबत प्रोटोकॉल प्रमाणे योग दिन विविध आसनांच्या माध्यमातून संपन्न करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/73063509359?pwd=eW4zSVZXeXJnTmNyazYvZGxsbEIzdz09
Meeting ID: 730 6350 9359
Passcode: QXn2p9