चाळीसगाव, प्रतिनिधी । येथे शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज चाळीसगाव तालुका शिवसेनेच्यावतीने साजरा करण्यात आला, तसेच वयोवृद्ध शिवसेना नेते तुकाराम मामा कोळी यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून साजरा केला. तसेच यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेच्या स्थापनेत मुंबईमध्ये हजर असलेले वयोवृद्ध शिवसेना नेते तुकाराम मामा कोळी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तुकाराम मामा कोळी यांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर सहा महिन्यात चाळीसगावात शिवसेना स्थापन करून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेना विस्तार करण्यात मोठा वाटा उचलला होता, म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिक तुकाराम मामा यांचा आदर करतात. महेंद्र पाटील व दिलीप घोरपडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच शिवसेनेच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विद्यमान सरकारातील चांगल्या कार्याचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, महिला आघाडी तालुका प्रमुख सविता कुमावत, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, बाबूलाल पवार, गुरुजी ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा पाटील, आगोणे बोराडे, प्रभाकर भोगले, पांडुरंग बोराडे, धर्मा राठोड, संतोष गायकवाड, नंदू गायकवाड, गणेश भवर, दिनेश विसपुते, प्रदीप पिंगळे, भावडू साळुंके, सुभाष राठोड, नाना चौधरी, छोटू देवरे, अनिल पिंगळे, वसीम चेअरमन, चेतन कुमावत आदी उपस्थित होते.