चोपडा – चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांचा जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने चोपडा शहर व काँग्रेसतर्फे चोपडा येथील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधींना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल जी को लाना है देश को बचाना है. महंगाई को हटाना, है राहुल जी को लाना है बेरोजगारी हटाना है अब जनता ने ठाणा है राहुल जी को लाना है.
जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षातर्फे राहुल गांधींना शुभेच्छा देण्यासाठी एक अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सरचिटणीस अजबराव पाटील यांनी मोदी सरकार विविध आघाड्यांवर फेल झाल्याने आता राहुल गांधींना सर्वोच्च स्थानी बसवण्यासाठी जनता आतुर असल्याचे नमूद केले.
यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के .डी .चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून राहुल गांधी हे दूरदृष्टीचे नेते असल्याने देश वाचवण्यासाठी राहुल गांधींची गरज असल्याचे प्रतिपादन केले .आता भारतीय जनतेने ठाम निश्चय केला आहे की देशाची घडी नीट बसवण्यासाठी राहुलजी सर्वोच्च स्थानी बसवनार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, डी एम पाटील, एडवोकेट एस डी पाटील, प्रदीप पाटील, एन एस यु आय राज्य सचिव चेतन बाविस्कर ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, इलियास पटेल, देवकांत चौधरी, कांतीलाल सनेर सुप्रिया सनेल , सुरेखा महाजन आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.