जळगाव, प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ व झाशीची राणी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अनुक्रमे जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने शिवसेना महानगर महिला आघाडीतर्फे शिवसेना कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, शहर प्रमुख मनीषा पाटील, उपशहर प्रमुख निळू इंगळे, मंगला बारी, संगीत गवळी, आशा खैरनार, विमल वाणी, शारदा तायडे आदी उपस्थित होते.