जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका हॉस्पिटलमधून १७ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रिंगरोड येथील आरूश्री हॉस्पिटल येथे कांचन शिवाजी पवार (वय-२५) हि परिचारीका म्हणून नोकरीला आहे. त्यांची मैत्रीण ज्योती कालूसिंग तडवी आणि दिपाली गोविंदा कोडंबे ह्या दोघंना आयसीयू विभागात नेमणूक करण्यात आली होती. कांचन पवार यांच्या नावावर असलेला मोबाईल ज्योती तडवी यांना वापरण्यासाठी दिला होता. १३ जून रोजी रात्री १२.१० दोघे परिचारीका मोबाईल जवळ ठेवून झोपल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोघांचे १७ हजार रूपये किंमतीचे मोबाईल चोरून नेल्याचे सकाळी ६ वाजता उघडकीला आले. संपुर्ण हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता दोघांचे मोबाईल चोरून नेल्याचे उघड झाले. कांचन पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. संदीप पाटील करीत आहे.