जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा ६४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून यात आज दिवसभरामध्ये एकाच मृत्यू झाला आहे तर १३१ जणांची कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-3 , जळगाव ग्रामीण-3 , भुसावळ-5, अमळनेर-0 , चोपडा-2 , पाचोरा-4 , भडगाव-1 , धरणगाव-4 , यावल-21, एरंडोल-3, जामनेर-2, रावेर-3, पारोळा-3, चाळीसगाव-5, मुक्ताईनगर-3, बोदवड-2 असे एकुण 64 बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हाभरात आजच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत एकुण 1 लाख 41 हजार 785 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 1 लाख 37 हजार 636 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 1 हजार 583 रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान आज दिवसभरात भुसावळ तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


