Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

व्यावसायिक भागवत भंगाळे यांच्या निवासस्थानी झाडाझडती

by Divya Jalgaon Team
June 17, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बी एच आर प्रकरण जिल्ह्यातील सात दिग्गजांना घेतले ताब्यात

BHR

जळगाव, प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात आज पहाटे ताब्यात घेण्यात आलेले व्यावसायिक भागवत भंगाळे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात चौकशी झाल्यानंतर त्यांच्या घरी झाडाझडती सुरू झाली आहे.

जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यात व्यावसायिक भागवत भंगाळे यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भंगाळे यांच्या अटकेची माहिती मिळतात आमदार राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे आदींनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेतली. सुमारे तीन तास चौकशी झाल्यानंतर भागवत भंगाळे यांना त्यांच्या घरी नेण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी आता झाडाझडती सुरू झाली आहे. यामुळे बीएचआर प्रकरणाशी संबंधीत पुरावे त्यांच्या घरून शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

Share post
Previous Post

बी एच आर प्रकरण जिल्ह्यातील सात दिग्गजांना घेतले ताब्यात

Next Post

बीएचआर घोटाळाप्रकरणी औरंगाबादचे अंबादास मानकापे यांना अटक

Next Post
बीएचआर घोटाळाप्रकरणी औरंगाबादचे अंबादास मानकापे यांना अटक

बीएचआर घोटाळाप्रकरणी औरंगाबादचे अंबादास मानकापे यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group