औरंगाबाद, वृत्तसंस्था । मराठवाड्यातील आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ सहकाररत्न अंबादास मानकापे यांनाही बीएचआर घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे
पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने आज सकाळपासूनच सुरु केलेल्या अटकसत्रात जळगावात पण संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्याचप्रमाणे बी एच आर पतसंस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्यांमध्ये अंबादास मानकापे यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले मात्र आताच सविस्तर माहिती देण्यास पोलीस सूत्रांनी नकार दिला
या पूर्वी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर केलेल्या बेकायदा बांधकामाच्या आरोपावरूनही सहकार रत्न अंबादास मानकापे यांना अटक झाली होती त्यांच्याविरोधात सिडकोने गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने वयाच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांचा जामीन मंजूर केला होता . आता त्यानंतर बी एच आर पतसंस्थेच्या घोटाळ्यात गंभीर आरोपांवरून अंबादास मानकापे यांना अटक केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे
आदर्श महिला नागरी सहकारी बँकेसोबतच आदर्श महिला पतसंस्थेच्या शाखांचे त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात उभे केलेले जाळे सर्वश्रुत आहेच . काँग्रेसच्या राजकारणाशी जवळीक ठेवणारे अंबादास मानकापे औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणातील प्रभावी लोकांपैकी एक समजले जातात . जिल्ह्यात काही व्यवसायांचा सुद्धा त्यांनी विस्तार केलेला आहे आदर्श दूध , इंग्रजी माध्यमाच्या शाळा , जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी , कापड व्यवसाय हे त्यापैकी काही आहेत औरंगाबाद शहराजवळच्या आणि कन्नड तालुक्यातील सहकारी रुग्णालयांचेही ते संस्थापक अध्यक्ष आहेत. जिल्ह्याच्या काँग्रेस वर्तुळासह अन्य पक्षांमधील नेत्यांनीही अंबादास मानकापे यांना झालेल्या अटकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.