जळगाव – जळगाव शहरातील भागवत भंगाळे यांचा बी एच आर पतसंस्थेच्या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याच्या संशयावरून आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून आज पहाटेच जळगाव जिल्ह्यातून सात दिग्गजाना अटक केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे चाळीस हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक आज पहाटेच जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे.
यात पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे, पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा या सात जणांना अटक केली आहे.