चोपडा – चोपडा येथील तेली समाजाच्या कार्यकर्त्यांनी चोपडा येथील प्रांताधिकारी सुमित शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा चोपडा तालुकाध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी चोपडा तेली समाजाचे विश्वस्त टी .एम. चौधरी,विश्वस्त नारायण चौधरी,विश्वस्त देवकांत चौधरी,महिला उपाध्यक्ष योगिता चौधरी,सचिव रंजना चौधरी,युवक उपाध्यक्ष कमलेश चौधरी या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन पुढील आंदोलनाची सूचना दिली.
या वेळी तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी यांनी निवेदन देतांना सांगितले की, ओ.बी सी समाजाची जात निहाय जनगणना करून जन संख्येनुसार आरक्षणाचा कायदा करून ओ.बी.सी ना न्याय मिळावा अशी मागणी केली. या वेळी तेली समाजाचे विश्वस्थ व उपाध्यक्ष टी .एम.चौधरी म्हणाले कि राज्य व केंद्र शासनाने उचित पाऊल उचलून ओ.बी.सी समाजाला न्याय द्यावा.
एक महिन्याच्या आत उचित कार्यवाही दिसून न आल्यास समस्त तेली समाज, त्यासाठी ओ.बी.सी. समाजाला न्याय द्या अन्यथा खुर्च्या खाली करा हे आंदोलन रस्त्यावर उतरून करेल अशा इशारा या वेळी देण्यात आला. तेली समाजाच्या महिला या आंदोलनात प्रखरतेने भाग घेतील असे महिला उपाध्यक्ष योगिता चौधरी व सचिव रंजना चौधरी यांनी स्पष्ट केले. प्रांताधिकारी सुमित शिंदे व तहसीलदार अमित गावित यांनी निवेदन समजून घेत सन्माननीय पंतप्रधान ,भारत सरकार व सन्माननीय मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना तेली समाजाच्या भावना काळवीत असल्याचे नमूद केले.