जळगाव – जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर दुचाकीला पिकअप मालवाहू गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संदीप उत्तम चौधरी वय २९ रा.कासमवाडी हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवारी रात्री साडेदहा च्या दरम्यान घडली.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कासमवाडी येथे रा. संदीप उत्तम चौधरी वय २९ हा तरुण आज मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी क्र. एमएच १९डीएल ३७०७ ने घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप व्हॅन ( एमएच १९ एस ९५११) ने जोरदार धडक दिली. या धडकेत संदीप चौधरी हा तरुण जागीच ठार झाला आहे.