जळगाव – कामावरून काढल्याच्या संशयावरून दोघांनी सरकारी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी शहरातील गुरांचा बाजार येथे सायंकाळी घडली. दाखल गुन्ह्यातील एकाला अटक आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रालियम कॉर्पोरेशन लिमीटेडच्या एलपीजी बॉटलींग प्लान्टमध्ये प्लॉन्ट इन्चार्ज म्हणून मनोज सिताराम वर्मा (वय-४३, रा. गिरनार अपार्टमेंट, लक्ष्मी नगर) गेल्या तीन वर्षांपासून काम करतात. एलपीजी प्लॉन्टमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून मजूरांची भरती केली जाते. त्यात राहुल सुभाष सपकाळे (कोळी) रा. मेस्कोमाता नगर हा दोन वर्षांपूर्वी मजूरी काम करत होता.
तेव्हा ठेकेदाराने त्याला कामावरून काढून टाकले होते. मनोज वर्मा यांच्यामुळे काढले असा आरोपी राहुल सपकाळे यांनी केला होता. तुझ्यामुळे मला काढले आहे. तुला मी सोडणार नाही असे बोलून निघून गेला होता. दरम्यान २९ ऑक्टोंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मनोज वर्मा हे कामावरून चारचाकी (क्रमांक एमपी ०४ सीएफ ८१२३) ने घरी जात असतांना ढोर बाजार जवळ राहुल सपकाळे आणि त्याच्या एक अनोळखी मित्र दुचाकीवर आले.
त्यांनी काहीही न सांगता वर्मा यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले, आणि वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. मनोज वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यांनी केली अटक
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुकेश पाटील, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी संशयित आरोपी राहुल सपकाळे याला शनिपेठ परिसरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील, संदीप धनगर करीत आहे. आज संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.