Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात पतीला जन्मठेप

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

जळगाव –  पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या.आर.जे. कटारिया यांनी हा निकाल दिला.

पाचोरा तालुक्यातील वेरूळी खुर्द येथील रहिवाशी रवींद्र सुपडू पाटील (वय-३८) हा ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी दारू पिण्यासाठी बाहेर जायला निघाला असता पत्नी उमा हिने त्यास विरोध केला होता. त्यामुळे रात्री १ वाजता रवींद्र पाटील याने पत्नी उमा हिचा गळा दाबून व विष पाजून हत्या केली होती.

मयत उमा हिचा भाऊ गौरव युवराज पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी अनिल शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. यात सरकारतफेर् ११ साक्षीदार तपासण्यात आले. मयताचा मुलगा व प्रत्यक्षदशर्प साक्षीदार असलेला सोहम रवींद्र पाटील याच्यासह शवविच्छेदन करणारे डॉ.रमेश गढरी, वैद्यकिय तपासणी करणारे डॉ. अमित साळुंखे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी पुराव्याच्या आधारावर प्रखर युक्तीवाद करुन आरोपीला जन्मठेपेचीच शिक्षा मिळावी म्हणून मागणी केली. न्यायालयाने समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचे मुद्दे पाहता आरोपी दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीकडून ॲड.अविनाश जाधव यांनी बाजू मांडली.

Share post
Tags: Crime newsJalgaonपत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात पतीला जन्मठेप
Previous Post

कुलगाम हत्याप्रकरणी भाजयुमोतर्फे टॉवर चौकात आंदोलन

Next Post

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास पोलीस कोठडी

Next Post
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group