जळगाव- काल संपूर्ण जगामध्ये इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद(स व स) यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला.
हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांचे नाव उच्चारताना मुस्लिम बांधव आदर भावाने त्यांच्या नावाबरोबर सल्लल्लाहु आले ही वसल्लम असे उच्चारतात म्हणजे त्यांच्यावर अल्लाहची सदैव कृपा आणि शांती असो पैगंबर साहेबांचा जन्म मक्का येथे हे सोमवार दिनांक १२ रबी उल अवल इसवी सन ५७१ मध्ये झाला व त्यांचे देहावसन सोमवार दिनांक १२ रबीउल ११ व इसवी सन ६३३च्या मे महिन्यात झाले आहे.
इस्लामचे प्रेषित हजरत मुहंमद पैगंबर(स व स )हे केवळ मुसलमानांचेच नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणासागर आहेत.
हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय प्रशासन व पोलीस सेवेतील कार्यरत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जळगाव कोविड केअर युनिटचे अध्यक्ष गफ्फार मलिक, मुख्य आश्रयदाते मुफ्ती आतिकुर रहेमान, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख ,समन्वयक डॉक्टर जावेद शेख, वहीदत ए इस्लामी चे अतीक शेख,जामा मस्जिद ट्रस्ट चे तय्यब शेख, इदगाह ट्रस्ट चे अनिस शहा यांच्या हस्ते मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले ही अनिश चिस्ती लेखकाने लिहिलेली पुस्तिका व पवित्र कुराण याच्या प्रती देण्यात आल्या तसेच जळगाव शहरात व जिल्ह्यातील सन्माननीय व अभ्यासू अशा लोकांना सुद्धा या प्रती देण्यात आल्या असून ज्या कोणाला याबाबत पुस्तिका पाहिजे असल्यास त्यांनी फारुक शेख
९४२३१८५७८६ वर संपर्क साधावा संबंधितांना त्यांच्या घरी हे साहित्य पुरवण्यात येईल असे आव्हान करण्यात आलेले आहे.