Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आदिवासी बहुल भागातील रुग्णांसाठी अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध

जिल्ह्यास मिळाल्या १३ रूग्णवाहिका; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

by Divya Jalgaon Team
June 12, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
आदिवासी बहुल भागातील रुग्णांसाठी अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध

जळगाव – कोविड काळात रूग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून जिल्ह्यासाठी 13 रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. या रूग्णवाहिकांचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून या रूग्णवाहिका शासकीय सेवेत अर्पीत केल्या.

जिल्ह्यास प्राप्त झालेल्या १३ रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना प्रदान करण्यात आल्या. तर एक मोठ्या वाहनातील अद्ययावत सामग्रीने सज्ज असणारे मोबाईल मेडिकल युनिट ही रूग्णवाहिका आहे. ही रूग्णवाहिका जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर आदी तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रूग्णांना देखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहेत.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. या पेशंटसाठी रूग्णवाहिका मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला असून आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. जिल्ह्यात रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

या रूग्णालयांना देण्यात आल्या रुग्णवाहिका
जिल्ह्यातील पाल, रावेर, अमळनेर या ग्रामीण रुग्णालयाला तसेच मुक्ताईनगर व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाला अश्या 5 ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ (अमळनेर) प्राथमिक आरोग्य केंद्र, कजगाव (भडगाव ) रांजणगाव व उंबरखेड (चाळीसगाव), अडावद व वैजापूर (चोपडा ), वाकोद (जामनेर), लोहारा (पाचोरा) अश्या 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्याने त्या परिसरातील रुग्णांसाठी दिलासा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, जि .प . चे आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्य अमित पाटील, दीपक राजपूत, उद्धव मराठे, मोहाडीचे सरपंच डम्पी सोनवणे, टेम्पो फोर्स कंपनीचे संचालक चंद्रशेखर अग्रवाल, आतिष सोनवणे, सेवा अभियंता विवेक नारखेडे यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

Share post
Tags: #Civil Hospital jalgaon#Jalgaon Civil Hospitalpalakmantri gulabrao patilमोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध
Previous Post

रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

Next Post

जनमत प्रतिष्ठान कडून नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनजागृती

Next Post
जनमत प्रतिष्ठान कडून नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनजागृती

जनमत प्रतिष्ठान कडून नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group