Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

न्यू सम्राट कॉलनीतून तेलाचे २३ डबे लांबवणाऱ्यास अटक

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव – न्यु सम्राट कॉलनीत दिवाळीसाठी लागणाऱ्या तेलाचे २३ डबे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

अर्जूनराम पोखरराम प्रजापत (वय४६) रा. न्यु सम्राट कॉलनी जळगाव हे केटरींगचा व्यवसाय करतात. घराच्या बाजूला एका खोलीत त्यांच्या व्यवसायाचा सामान ठेवला जातो. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रामाणे खोलीवर गेले असता दिवाळी सणासाठी लागणारे तेल घेण्यासाठी १५ किलो वाजनाच २२ डबे व इतर सामान भरून ठेवले होते. त्यानंतर ९ वाजता कंमाउंडचे गेट बंद करून निघून गेले. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानावर गेले असता खोलीतील तेलाचे डबे चोरी केल्याचे दिसून आले. ३४ हजार २१० रूपये किंमतीचे २२ तेलाचे डबे चोरीस गेल्याप्रकरणी अर्जून प्राजपत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

हा  गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंगापूरवाडा येथून संशयित आरोपी गोविंद  बागडे (वय-३०, रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा) याला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील २३ हजार ३२५ रुपये किंमतीचे १५ तेलाचे डबे हस्तगत केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज न्यायलयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे हे कामकाज पाहत आहे.

पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई करत आरोपीस अटक केली व मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून त्याचाही शोध घेणे सुरू आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonJalgaon crime newsन्यू सम्राट कॉलनीतून तेलाचे २३ डबे लांबवणाऱ्यास अटक
Previous Post

प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

Next Post

सरदार पटेल, महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

Next Post
सरदार पटेल, महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

सरदार पटेल, महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group