जळगाव, प्रतिनिधी । नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार दि. 14 जुन, 2021 रोजी होणारा जून महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.